मुंबई

Aarey raid : आरेतील गोदामावर छापा, २५ लाखांचा धान्यसाठा जप्त

स्वालिया न. शिकलगार

मुंबई : पुढारी ऑनलाईन

गोरेगाव आरे कॉलनी (Aarey raid) परिसरात स्वस्त धान्याचा काळा बाजार उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरेतील गोदामावर छापा टाकत २५ लाखांचा धान्यसाठा तांदूळ-गहू जप्त केले. (Aarey raid)

गोरेगाव परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात स्वस्त धान्याचा काळा बाजार सुरू होता. याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्वस्त धान्य विभागाच्या मदतीने आरे परिसरामध्ये असलेल्या एका गोदामावर छापा टाकला आहे.या छाप्यामध्ये काळ्या बाजारात जाणारे २५ लाख रुपयांचे स्वस्त धान्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी २० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची पुढील चोकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचलं का? 

SCROLL FOR NEXT