मुंबई : सार्वजनिक सुट्टी जाहीर केली की, अनेकजण पिकनिकचा बेत आखतात, तर काहीजण घरी आराम करतात. मात्र सुट्टी ही मतदानासाठी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांनो मतदानासाठी घराबाहेर कडून लोकशाहीने दिलेला आपला हक्क बजावा, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या निवडणूक विभागाने केले आहे.
प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य सरकारने गुरुवार 15 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. एवढेच नाही तर सुट्टी एवढेच नाही तर आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी न देणाऱ्या आस्थापनावर कारवाई करण्याचा निर्णयही घेतला आहे.
मतदानादिवशी देण्यात येणाऱ्या सार्वजनिक सुट्टीचा फायदा उठवत काही मतदार पिकनिकची मजा घेतात. तर काहीजण घरातच आराम करतात. त्यामुळे यावेळी मतदानाचा दिवस जोडून सुट्टी असलेल्या दिवशी न ठेवता गुरुवारी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पिकनिकला जाणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होईल, असा विश्वास निवडणूक विभागाने व्यक्त केला.
दरम्यान, मुंबईकरांनी मतदानाचा हक्क बजावून आपल्याला हवा असलेला नगरसेवक मुंबई महानगरपालिकेवर पाठवावा, अशी विनंतीही निवडणूक विभागाकडून करण्यात आली आहे.