मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट निवडणूका एप्रिलमध्ये; संभाव्य तारखा जाहीर

backup backup

मुंबई,  पुढारी वृत्तसेवा :  मुंबई विद्यापीठाने सिनेट निवडणुकांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून निवडणूक कार्यक्रमाच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो, असेदेखील म्हटले आहे. प्रत्यक्ष सिनेट निवडणूक पुढील वर्षी एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. २१ एप्रिलला निवडणूक आणि २४ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. तर नोंदणी आजपासून सुरु झाली आहे.

– सुधारित सिनेट निवडणुक वेळापत्रक

३० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२३- नोंदणीकृत पदवीधर मतदार नोंदणी अर्ज भरणे
१ डिसेंबर २०२३ ते २५ फेब्रुवारी २०२४- नोंदणी अर्ज छाननी, आक्षेप व तात्पुरती मतदार यादी प्रसिद्धी
२६ फेब्रुवारी २०२४- अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
२९ फेब्रुवारी २०२४- निवडणूक अधिसूचना जाहीर
११ मार्च २०२४- उमेदवारी अर्ज स्विकारणे
१३ मार्च २०२४- उमेदवारी अर्ज छाननी
१५ मार्च २०२४- अर्ज वैधतेबाबत कुलगुरू अपील करणे
१८ मार्च २०२४- अर्ज मागे घेणे
२० मार्च – उमेदवारांची यादी प्रसिध्द
२१ एप्रिल २०२४- सिनेट निवडणूक ( सकाळी ९ ते सायंकाळी ५ )
२४ एप्रिल २०२४- मतमोजणी

हेही वाचंलत का?
SCROLL FOR NEXT