मुंबई : रस्त्यांवरील वाहनांच्या पार्किंगमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून परिवहन विभागाच्या वतीने राज्यासाठी 'एकात्मिक पार्किंग धोरण' आणले जात आहे.  (Pudhari Photo)
मुंबई

Mumbai News | उद्याने व मैदानांच्या खाली पार्किंगची व्यवस्था करा!

Underground Parking Mumbai | राज्याचे पार्किंग धोरण लवकरच आणणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

पुढारी वृत्तसेवा

Underground Parking Mumbai

मुंबई : वाहनधारकाकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नसेल तर ते संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रत्येक महापालिकेने त्यांच्या उद्याने आणि मैदानांच्या खाली पार्किंगची व्यवस्था निर्माण होईल अशा पद्धतीने रचना करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. ठाणे महापालिकेने मैदानाच्या खाली तयार केलेले वाहनतळ त्याचे उत्तम उदाहरण आहे, असेही ते म्हणाले.

रस्त्यावरील वाहनांच्या पार्किंगमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून परिवहन विभागाच्या वतीने राज्यासाठी 'एकात्मिक पार्किंग धोरण' आणले जात आहे. या धोरणाची सुरुवातीला मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये येणाऱ्या महापालिकांमध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी एमएमआरडीए क्षेत्रातील महापालिका आयुक्तांची बैठक पार पडली.

या बैठकीला अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह सर्व महापालिका आयुक्त उपस्थित होते. त्यावेळी सरनाईक बोलत होते. महापालिका क्षेत्रामध्ये पार्किंगच्या समस्येमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी सुचवलेल्या सूचना तसेच अभिप्राय यांचा येणाऱ्या पार्किंग धोरणामध्ये समावेश केला जाईल, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

रस्त्यांवरील अनेक वर्षे बंद असलेली वाहने तातडीने हटवा

विकास आणि सुविधांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर पार्किंग प्लाझा उभारण्यात यावेत, यासाठी मुंबई महापालिकेने उभारलेले पार्किंग प्लाझा धोरण इतर महापालिकांनी स्वीकारावे जेणेकरून भविष्यात शहराची पार्किंग समस्या कमी होण्यास मदत होईल. रस्त्यावर अनेक वर्षे बंद असलेली वाहने तातडीने टोईंग करून हलवण्यात यावीत, रस्ते मोकळे करावेत, असे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी पालिका आयुक्तांना दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT