मुंबई : क्रॉफर्ड मार्केट परिसरात छत्री घेण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली आहे.  pudhari photo
मुंबई

Mumbai monsoon shopping : मुंबईत छत्रीचा बाजार फुलला

पावसामुळे मागणीत वाढ झाल्याने खरेदीसाठी झुंबड

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : गेल्या दोन -तीन दिवसापासून पावसाचा जोर मुंबई शहर व उपनगरात वाढला आहे. त्यामुळे छत्री खरेदीसाठी मुंबईकरांची बाजारात झुंबड उडाली आहे. शंभर रुपयापासून ते साधारणतः २ हजार रुपयांपर्यंत छत्रीचे दर आहेत. यावर्षी छत्री मागे सरासरी पाच रुपयांपासून ते दहा रुपयांची वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

मुंबईतील प्रसिद्ध छत्री बाजार मुख्यतः प्रिन्सेस स्ट्रीट,दवा बाजार परिसर,क्रॉफर्ड मार्केट, कोलभाट लेन,बाबू गेनु रोड याठिकाणी घाऊक विक्रेते आहे तर भुलेश्वर मार्केट, दादर,कुर्ला,अंधेरी येथील बाजारात किरकोळ विक्रेते आहेत. याठिकाणी सर्वप्रकारच्या छत्र्या मिळतात. त्यात दोन व तीन फोल्ड प्रकाराच्या छत्री तर मुलांसाठी रंगीत व कार्टून छत्र्या आहेत.

यंदा पावसाला उशिर झाल्यामुळे सुरुवातीला विक्री कमी झाली होती.पण;सध्या मुसळधार पावसामुळे छत्रीला ग्राहकांची मागणी वाढत आहे. बाजारात भारतीय व चिनी या दोन्ही प्रकारच्या छत्र्या आहेत. छत्रीबरोबर रेनकोट कीट ४६० रुपयांपासून पुढे असल्याचे सांगण्यात आले.

काळबादेवी परिसरात सुमारे ५० च्यावर विक्रेते आहेत. छत्रीसाठी लागणारे कापड किंवा अन्य कच्चा माल हा चीनमधून आणला जातो असे विक्रेत्यांचे मत आहे. या परिसरांमधून मुंबई, ठाणे सह विशेषत: कर्नाटक, केरळ याठिकाणी मोठ्या प्रमाणात छत्री, रेनकोट पाठविले जातात.त्याचबरोबर मध्यप्रदेश व गुजरात येथील मोठ्या बाजारपेठेत विविध ब्रॅण्डच्या छत्र्यांनाही मागणी आहे.

वसई, भिवंडी,पालघर येथे उत्पादन होते. याबाबत विक्रेते महेश कोठारी म्हणाले, साध्या १०० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत तर चांगले कापड व दर्जाच्या विविधरंगी ब्रॅण्डच्या छत्र्या या ५०० रुपयांवर आहेत. मात्र;सर्वसामान्य ग्राहकांचा १५० रुपयापासून ते ३०० रुपयांपर्यंत छत्री घेण्याचा कल आहे. यावर्षी छत्री मागे सरासरी ५ ते १० रुपयापर्यंत वाढ झाली आहे.

नावीन्यपूर्ण फॅन असलेली छत्री १८०० रुपये

छत्री मध्ये गार हवा येणारी नाविन्यपूर्ण फॅन असलेली छत्री १८०० रुपये तर आकर्षक मॅजिक छत्री ६५० रुपयांपासून पुढे आहे. यालाही ग्राहकांची पसंती असल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT