Mumbai Shri Bodybuilding Pudhari
मुंबई

Mumbai Shri Bodybuilding: गणेश पेडामकर ठरला ‘मुंबई श्री’; महिलांमध्ये रेखा शिंदेची दमदार बाजी

प्रतिस्पर्ध्यांवर मात करत किताब पटकावला; शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रभावी कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

गणेश पेडामकर

मुंबई : बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस संघटनेतर्फे आयोजित ‌‘मुंबई श्री‌’ शरीरसौष्ठव स्पर्धेत बॉडी वर्कशॉप जिमच्या गणेश पेडामकरने बाजी मारत ‌‘मुंबई श्री‌’ किताब मिळवला. तर, महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत बॉडी फिटनेस जिमच्या रेखा शिंदेने अपेक्षेप्रमाणे बाजी मारली.

मालाड येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय उद्यानात झालेल्या या स्पर्धेत मुंबई श्री किताबाच्या (चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स); अंतिम फेरीत आठही गटविजेते विजेत्यांमध्ये गणेश पेडामकरसह मनीष वाघेला, अक्षय खोत आणि चेतन नाईक यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या सर्व तगड्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये गणेशची आखीवरेखीव शरीरयष्टी आणि प्रभावी पोझिंगने जजेसना प्रभावित केले. बालमित्र जिमचा मनीष वाघेला उपविजेता ठरला. महिलांच्या स्पर्धेत बॉडी फिटनेस जिमच्या रेखा शिंदेने दुर्गा कुमारी आणि लविना नरोन्हा यांच्यावर मात करत वर्चस्व राखले.

जय भवानी व्यायाम मंदिर ट्रस्ट आणि नगरसेवक ॲड. सिद्धांत शर्मा यांच्या सहकार्याने आयोजित स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ माजी खासदार गजानन कीर्तीकर, आमदार अतुल भातखळकर, नगरसेवक सिद्धांत शर्मा, विजय भोसले, मुंबई अध्यक्ष अजय खानविलकर, सरचिटणीस राजेश सावंत, मुंबई उपनगर शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष किट्टी फनसेका, सरचिटणीस विशाल परब, सुनील शेगडे, भारत श्री शाम रहाटे, कुणाल केरकर, नगरसेवक सचिन डोंगरे, माजी नगरसेवक प्रशांत कदम यांच्या उपस्थितीत पार पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT