Mumbai Rain Pudhari
मुंबई

Mumbai Rain: मुंबई परिसरात मुसळधार; वसई-विरार शहर जलमय

गणपती बाप्पाच्या आगमनाच्या एक दिवस आधी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. वसई-विरारमध्ये रस्ते जलमय झाले असून गणेशोत्सवाच्या तयारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या एक दिवस आधी मुंबई, उपनगर, ठाणे आणि कल्याण, डोंबिवली परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईमध्ये मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. तिकडे वसई-विरारमध्येही मुसळधार पाऊस झाला असून, रस्ते जलमय झाले आहेत.

सोमवारी गणपती बाप्पाचे आगमन होणार असताना, त्याआधीच मुंबई व परिसरात पावसाचे आगमन झाले आहे. मध्यरात्रीपासून मुंबईच्या अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीवरही पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आज मुंबईकर बाप्पाच्या आगमनाच्या तयारीसाठी बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी करतील.

वसई-विरारमध्ये वाहनेही पाण्याखाली

वसई-विरार शहरात रविवारी सकाळपासूनच पाऊस कोसळत होता. वसई, नालासोपारा आणि विरारमधील बहुतेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहने पाण्याखाली गेली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT