Mumbai Pune Missing Link pudhari
मुंबई

Mumbai Pune Missing Link: पहिल्याच पावसात 'इन्फ्रा मॅन'चा... मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळताच सपकाळांनी काढला चिमटा

Anirudha Sankpal

Mumbai Pune Missing Link: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर नव्याने उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंकचे नुकतचे उद्घाटन झालं होते. मात्र जोरदार पावसात या नव्या मिसिंग लिंकच्या कामाचा दर्जा पार ढासळून गेला. प्रकल्पाच्या एका भागाचा स्लॅब खचल्यामुळं मोठ्या प्रमाणावर माती आणि दगड रस्त्यावर आल्याचे दिसत आहे. यामुळं मुंबई - पुणे महामार्गावरील वाहतूक खोळंबली आहे.

अवघे काही आठवडेच जुना असलेल्या मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळल्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांनी टीका करताना त्यांना देण्यात आलेल्या इन्फ्रा मॅन बिरुदावलीची देखील खिल्ली उडवली.

हर्षवर्धन सपकाळ आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहितात, 'पहिल्याच पावसात Infra Man चा Disaster Man झाला आहे! दोन खड्ड्यांना "पहिल्या पावसाचं टेस्टिंग" म्हणणारे मुख्यमंत्री, आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या हजारो कोटींच्या 'मिसिंग लिंक' प्रकल्पावर दरड कोसळून रस्ता बंद झाल्यालाही "मान्सून ट्रायल" म्हणणार का?

जगभर डोंगर फोडून बोगदे उभे राहतात, पण महाराष्ट्रात पहिल्याच पावसात प्रकल्प कोसळतात. कारण समस्या पावसाची नाही, तर निकृष्ट कामांची, भ्रष्टाचाराची आणि कंत्राटदारांना मिळणाऱ्या राजकीय अभयाची आहे. हजारो कोटींचे प्रकल्प... पण पहिल्याच पावसात विकासच 'मिसिंग'!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT