Missing Link Project : दोन महिन्यांतच मिसिंग लिंकवर खड्डे

घाट भागात सर्वाधिक पाऊस असल्याने रस्त्यावर खड्डे पडले; मात्र ते लगेचच बुजवण्यात आल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले.
Missing Link Project
दोन महिन्यांतच मिसिंग लिंकवर खड्डेpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी करणाऱ्या मिसिंग लिंक रस्त्यावर खड्डे दिसू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. ७ हजार कोटी खर्चून एमएसआरडीसीने या मार्गाची बांधणी केली. दोनच महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण झाले.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा एकूण ९४.५ किमी लांबीचा रस्ता आहे. द्रुतगती महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग ४ हे दोन्ही रस्ते खालापूर टोल प्लाझा येथे एकत्र येतात आणि खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात. या भागात दरड कोसळण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच वाहतूक कोंडीही होते. त्यामुळे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्युट या भागात १३ किमीचा मिसिंग लिंक उभारण्याचे एमएसआरडीसीने केले आहे. या प्रकल्पाचे काम २०१९ साली सुरू करण्यात आले होते. अनेकदा मुदतवाढ दिल्यानंतर अखेर यावर्षी काम पूर्ण झाले.

Missing Link Project
MSRDC highway project: एमएसआरडीसीची 8 वर्षांची ‘अधुरी एक कहाणी'

मिसिंग लिंकवरील दुहेरी बोगदा हा जगातील सर्वात रूंद बोगदा आहे. त्याची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली आहे. या प्रकल्पातील केबल स्टेड पूल हा देशातील सर्वात उंच पूल आहे. ७ हजार कोटी खर्चून एमएसआरडीसीने मिसिंग लिंक प्रकल्प उभारला.

मुख्यमंत्र्यांनी त्याचे कनेक्टिंग लिंक असे नामकरण केले. मात्र पहिल्याच पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडले. घाट भागात सर्वाधिक पाऊस असल्याने रस्त्यावर खड्डे पडले; मात्र ते लगेचच बुजवण्यात आल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले.

Missing Link Project
Mrinal Tai Gore Flyover: 248 कोटींचा उड्डाणपूल आणि उद्घाटनानंतरच्या एका तासातच पडले खड्डे; मुंबईकर संतप्त, Video Viral

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news