Mumbai Pune Expressway Traffic Update Pudhari
मुंबई

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्ववत; मिसिंग लिंक पुन्हा सुरु

Mumbai Pune Expressway Traffic Update: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्यानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Pune Expressway Traffic Update: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ दरड कोसळल्यानंतर वाहतुकीत करण्यात आलेल्या बदलांबाबत महामार्ग पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. सध्या मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी दिलासा मिळाला असून या दिशेची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तसेच पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अद्याप पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक मिसिंग लिंक मार्गावरून पूर्णपणे पूर्ववत करण्यात आली आहे. त्यामुळे या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनांना आता पूर्वीप्रमाणेच या मार्गाचा वापर करता येणार आहे. तसेच पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. दरड कोसळल्यानंतर हा मार्ग बंद केला होता.

यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी सर्व वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर (राष्ट्रीय महामार्ग-48) वळविण्यात आली आहेत. या मार्गावर वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी अतिरिक्त वेळ गृहीत धरून प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

महामार्ग पोलिसांनी नागरिकांना संयमाने वाहन चालवण्याचे, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, परिस्थिती सामान्य होईपर्यंत पुण्याहून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचाच वापर करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्या महामार्गावरील परिस्थितीवर संबंधित यंत्रणांकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्याबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT