Shiv Sena NCP Alliance Mumbai  Pudhari
मुंबई

BMC Politics | मुंबई महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी शिंदे शिवसेनेसोबत : तिन्ही पक्षांचे गटनेते अमेय घोले

Amey Ghole | तिन्ही पक्षांचे नेतृत्व शिवसेना करणार

पुढारी वृत्तसेवा

Eknath Shinde Shiv Sena NCP Alliance Mumbai

मुंबई : मुंबई महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आले असून एकत्रित गट स्थापन केला आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांचे नेतृत्व शिवसेना करणार आहे. गटनेते पदी अमेय घोले राहणार आहेत. तीनही पक्ष एकत्रित आल्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेची ताकद आता वाढणार आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे २९ नगरसेवक निवडून आले. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एक नगरसेवक निवडून आला होता. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी स्वतंत्र निवडणूक लढवल्यामुळे त्यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. तर शरद पवार यांच्या एकमेव नगरसेवकाने स्वतंत्र राहणार असल्याची घोषणा केली होती.

परंतु, मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीमध्ये भाजप शिवसेना महायुतीचे व विरोधकांचे समसमान सदस्य झाल्यामुळे अध्यक्ष कोणत्या पक्षाचा होणार हे चिठ्ठी ठरवणार होती. यासाठी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने शिवसेनेत सामील होऊन एक गट स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. अखेर तिन्ही पक्ष एकत्रित आले असून महापालिकेत एक गट स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या गटातील नगरसेवकांची संख्या आता ३३ झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT