Mumbai Police Video: त्या व्हायरल व्हिडिओतील तरुणाने दिली नवी माहिती, पोलिसांनी AC पण लावला! 
मुंबई

Mumbai Police Video: त्या व्हायरल व्हिडिओतील तरुणाने दिली नवी माहिती, पोलिसांनी AC पण लावला!

‘पचास पचास ग्रॅम पावडर डाल देगा खिसे मे’ : व्हायरल व्हिडीओतील तरुणाचे मुंबई पोलिसांना आवाहन

Namdev Gharal

Mumbai Police Video दिल्ली येथे सुरु असलेल्या नीट प्रकरणाचे लोन आता देशभर पसरत आहे. २३ जुलै रोजी मुंबईत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते. यातील तीन विद्यार्थ्यांना पकडून पुन्हा आंदोलनासाठी आल्यास खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवून आयुष्यभर तुरुंगात टाकण्याची धमकी एका पोलिसांने दिली असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर त्‍या संबधित पोलिसांचे निंलबन झाल्याचेही समजत आहे.

आता या प्रकरणात नवीन टिव्स्ट आला असून ज्या मुलांना या पोलिसांनी धमकी दिली होती त्‍यातील एकाने व्हिडीओ शेअर करत मुंबई पोलिसांविषयी इतकी कठोर भूमिका घेऊ नये असे आवाहन केले आहे. तसेच झालेली कारवाई पूरेशी असून आता त्‍यांना जास्त वेळ निलंबन करु नका असेही म्हटले आहे

राज ठाकरेंचे मांडले आभार

व्हायरल व्हिडीओ झाला असून यातील पोलिस खिशात ५० -ग्रॅम ड्रग्ज पावडर टाकून खोट्या गुन्ह्यात अडकवीन अशी धमकी देत आहे. मला राज ठाकरे, उद्धव ठाकर, अमित ठाकरे यांचे आभार कारण हा विषय माध्यमांसमारे मांडला यामुळे त्‍यांच्यावर कारवाई झाली हे योग्य झाले. असेही या तरुणाने सांगितले आहे.

प्रत्‍येक गोष्ट ब्लॅक व्हाईट नसते, ते काका मनाने खूप चांगले

संबधित मुलग्याने यातून मुंबई पोलिसांना त्‍या सस्पेंड केलेल्या पोलिसाला जास्त वेळ निलंबित करु नका असेही आवाहन केले आहे. तसेच संबधित पोलिस मनाने खूप चांगले होते, त्‍यांना आम्हाला खूप गरम होत आहे असे सांगितल्यावर त्‍यांनी गाडीचा एसीही चालू केला तसेच आम्हाला बोअर होते आहे असे म्हटल्यावर गाणी लावली यामुळे ते पोलिस काका मनाने खूप चांगले आहेत. तसेच गाडी प्रोटेस्टच्या ठिकाणीही आम्हाला सुरक्षित सोडले. त्‍यामुळे त्‍यांना जास्तवेळ निलंबन करु नका

गणपती साठी मुंबई पोलिसांची मोठी हेल्प

आता गणपती येणार आहेत तसेच मुंबईत मोठया प्रमाणात गर्दी हाते. मुंबई पोलिस हे मुंबईचे रक्षण करण्यात कुठेही कमी पडत नाहीत, तसेच गर्दीत मुंबईचे नियोजन करण्याचे काम ही पोलीस करत आहेत. त्‍यामुळे आता संबधितावर जास्त कारवाई करु नये त्‍यांचे निंलबन लवकर मागे घ्यावे असे आवाहन केले आहे.

पचास पचास ग्रॅम पावडर खिशात टाकेन

विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान मुंबईत ताब्यात घेण्यात आलेल्या विद्याथर्यांना पोलिस ड्रायव्हर पचास पचास ग्रॅम ड्रग्ज पावडर खिशात घालीन अशी धमकी देत असताना दिसत आहे. त्‍याचवेळी त्‍यातील एक मुलगा व्हिडीओ चित्रित करतो या व्हिडिओने मोठा वाद निर्माण झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच मुंबई पोलिसांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT