Mumbai police Decision on Firecracker Ban
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत - पाकिस्तान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत फटाके आणि रॉकेटवर ११ मे ते ९ जून २०२५ पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश मुंबई पोलिसांनी काढले आहेत. यादरम्यान फटाके आणि रॉकेट उडवणाऱ्यांवर कारवाई करण्य़ात येणार आहे.
याबाबत मुंबई पोलिसांच्या डीसीपी ऑपरेशन्सनी महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. पोलिसांनी ११ मे ते ९ जून २०२५ पर्यंत फटाके वाजवण्यास बंदी घातली आहे. ११ मे २०२५ ते ९ जून २०२५ या कालावधीत बृहन्मुंबईच्या हद्दीत कोणत्याही व्यक्तीने फटाके वाजवू नयेत किंवा चिडीसह कोणताही रॉकेट उडवू नये, असे आदेशात म्हटले आहे.