Mumbai housing Pudhari
मुंबई

Mumbai PAP Housing Scheme: प्रकल्पबाधितांसाठी ३४,१२९ पीएपी सदनिका; महापालिकेच्या अर्थसंकल्पात ८९० कोटींची तरतूद

बृहन्मुंबई महानगरपालिकाकडून विकास प्रकल्पांना गती; टप्पा-१ मध्ये १,५०० सदनिका मार्च 2026 पूर्वी हस्तांतरित

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात रस्ते, नाला रूंदीकरण, उड्डाणपूल, पादचारी पूल अशी विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांमध्ये अडथळा ठरणारे झोपडीधारक बेघर होवू नये, यासाठी महानगरपालिकेने प्रकल्पबाधितांकरिता ३४ हजार १२९ पीएपी सदनिका बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सन २०२६ - २७ च्या अर्थसंकल्पात ८९०.२० कोटीची तरतुद केली आहे. सन २०२५ -२६ च्या अर्थसंकल्पात ती ६२०.६३ कोटी रूपयांची तरतूद होती. 

मुंबई महापालिकेने प्रत्येक परिमंडळात ५ ते १० हजार प्रकल्पबाधितांना सदनिका बांधण्याचे उदिष्टे ठरविले आहे. त्या अनुषंगाने, आतापर्यंत प्रकल्पबाधितांकरिता ३४ हजार १२९ सदनिकांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी टप्पा- १ मध्ये प्रकल्पबाधितांकरिता अंदाजे १ हजार ५०० सदनिका मार्च २०२६ पूर्वी महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरित केल्या जाणार आहेत. तर उर्वरित सदनिका पुढील २ ते ५ वर्षांत हस्तांतरित करणे अपेक्षित आहेत. परिणामी मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्प नियोजीत वेळेत व सुरळीत पूर्ण होण्यास मदत होईल, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला.

या ठिकिणी पीएपीच्या सदनिका उभ्या राहणार :-

मुलुंड पुर्व, भांडुप पश्चिम, प्रभादेवी, अंधेरी पश्चिम, मालाड पुर्व, दहिसर आणि बोरिववी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT