मुंबई:
यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास लवकर पूर्ण झाल्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा वाढला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने ९ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई आणि रायगडच्या काही भागांसाठी उष्णतेबाबत ‘यलो अलर्ट’ दिला होता.
मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत ८ ऑक्टोबर रोजी कमाल तापमान ३७.६ अंश सेल्सिअस, तर कुलाबा येथे ३६.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे.
९ ऑक्टोबरसाठी मुंबईचे कमाल तापमान सुमारे ३७ अंश राहण्याचा अंदाज आहे. ऐरवी गर्दी असलेला मुंबईतील प्रसिद्ध मरीन ड्राईव्ह परिसर शुक्रवारी उष्ण हवामानामुळे निर्मनुष्य होता.