Mumbai Nal Bazaar  Pudhari
मुंबई

Ganesh Puja Items Price Hike: सुगंधी साहित्य खरेदीसाठी भक्तांची लगबग; दरात २० टक्क्यांची वाढ

धूप,अगरबत्ती,कापूरवडीला सर्वाधिक मागणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नळ बाजार येथे सुगंधी साहित्य खरेदीसाठी भक्तांची तुडुंब गर्दी पहावयास मिळत आहे. गणेश मूर्तीच्या पूजेसाठी लागणाऱ्या विशेषत: धूप अगरबत्ती व कापूरवडीला सर्वाधिक मागणी आहे. मात्र यावर्षी सुगंधी साहित्य दरात सरासरी २० टक्के वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सुगंधी साहित्यात वाढ झाल्याने भक्तांच्या खिशाला चाट बसणार आहे.

गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेपूर्वी पूजेच्या साहित्याची खरेदी केली जाते. घरगुती पूजा व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून सुगंधी साहित्य घेतले जाते. विविध प्रकारच्या अगरबत्ती, धूप व धूपकांडी, कापूरवडी, अगरबत्ती याला सर्वाधिक मागणी असते.

त्याचबरोबर वात, लहान वस्त्र, मधाची बाटली, अत्तर, गंधगोळी खरेदीकडे कल वाढला आहे. सुगंधी उत्पादन बंगळुरू, म्हैसूर, गया यासह गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश या ठिकाणी होते. परंतु बंगळुरू हे अगरबत्ती उत्पादनाचे प्रमुख केंद्र मानले जाते. मुंबईत भुलेश्वर, मस्जिद बंदर येथे धूप, अगरबत्ती व पूजेच्या साहित्याचे विक्रेते आहेत.

गेल्या आठवड्यापासून नळबाजार येथील लोबान गल्ली सुगंधी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी साहित्य घेण्याकरिता भकतांची गर्दी होऊ लागली आहे. याबाबत विक्रेते अंकुश मेरूळे म्हणाले, सुगंधी साहित्य दरात वाढ झाली असली तरी ग्राहक कमी झालेले नाहीत. गणेश चतुर्थीपर्यंत भक्त येत असतात. सर्व साहित्य बंगळुरूमधून आणले जाते. त्यामुळे वाहतूक खर्चही वाढला आहे.

दरावर एक नजर

विविध प्रकारचे धूप१ किलो-१२० रूपयापासून ते ८०० रुपयापर्यंत (साधा १२० रुपये, रोमिओ धूप १६० व पिवर धूप १६० रुपये)

कापूर वडी-१०० ग्रॅम १२० रुपये

साधा कापूरवाडी-२०० ग्रॅम २४० रुपये

भीमसेन कापूरवाडी- २५० ग्रॅम ३०० रुपये

अगरबत्ती १६० रुपयापासून ते १०५० रुपयापर्यंत (१०० नग बॉक्स)

मसालावाली अगरबत्ती १४०० रुपये

वाती-१ डझन ३० रुपये, ६० रुपये व १०० रुपये.

लहान वस्त्र-१ डझन ६० रुपये

मधाची बाटली ८० रुपये

अत्तर १ डझन ६० रुपये

गंध गोळी नग १० रुपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT