Mumbai Standing Committee election Pudhari
मुंबई

Mumbai Standing Committee election: मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये जोरदार लॉबिंग; 20 फेब्रुवारीला होणार निर्णायक निवड

प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर, प्रकाश गंगाधरे, राजश्री शिरवडकर यांची नावे चर्चेत; 74 हजार कोटींच्या तिजोरीची चावी कुणाकडे?

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महापालिकेच्या तिजोरीची चावी असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरु झाले आहे. येत्या 20 फेब्रुवारी रोजी स्थायी समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर, प्रकाश गंगाधरे आणि राजश्री शिरवडकर आदींच्या नावांची जोरदार चर्चे सुरु आहे.

मुंबईचा महापौर, उपमहापौर विराजमान झाल्यानंतर आता नगरसेवकांसह पालिका प्रशासनाचे स्थायी समिती अध्यक्ष पद कुणाला मिळते, याकडे लक्ष लागून राहिले आहे. भारतीय जनता पार्टीचे 89 नगरसेवक निवडून आल्याने स्थायी समिती अध्यक्ष पद त्याच्याच पारड्यात पडणार आहे. परंतु या पदासाठी 4 ते 5 नगरसेवकांची नावे समोर येत आहेत. मात्र पक्षश्रेष्ठींचा कुणाला आशीर्वाद मिळतो, हे 20 तारखेलाच कळेल.

आशिया खंडात सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेचे आर्थिक बजेट 74 हजार कोटी आहे. अशावेळी स्थायी समिती अध्यक्षांना मुंबई महानगरातील सुमारे 75 लाखांच्या पुढे कंत्राट पास करणे, बजेटसाठी निधी मंजूर करणे, कंत्राटदार पास करणे असे विविध महत्वाचे मुद्दे आणि प्रस्ताव पास करणे आदीं वैधानिक अधिकारी आहेत. यामुळे महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष पदाला महत्वाचे मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT