BMC Politics Pudhari
मुंबई

Mumbai Mayor Election: आंगणेवाडी यात्रेनंतर मुंबई महापालिकेचा नवा महापौर; 11 फेब्रुवारीला निवडणूक होण्याची शक्यता

भाजप-शिवसेना गट नोंदणी पूर्ण; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या मंजुरीनंतर तारीख जाहीर होणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेवर बसणाऱ्या भाजप-शिवसेनेच्या गटाची नोंदणी झाल्यामुळे आंगणेवाडी यात्रेनंतर 11 फेब्रुवारीला महापौर निवडणूक घेण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या तारखेवर शिक्कामोर्तब केल्यानंतरच हा मुहूर्त जाहीर होईल.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा सोमवार 9 फेब्रुवारीला असल्यामुळे नगरसेवकांच्या विनंतीनुसार 11 फेब्रुवारी ही तारीख निवडणुकीसाठी निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असले तरी समिती सदस्य पदाच्या संख्येवरून काही तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे महापालिकेने 31 जानेवारीला ठेवलेली महापौर निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पुढे ढकलण्यात आली. आता भाजपा व शिवसेनेची गट नोंदणी झाली आहे.

त्यामुळे मंगळवारी भाजपा व शिवसेनेच्या नेत्यांची चर्चा करून, महापौर निवडणुकीसाठी निश्चित करण्यात आलेल्या 11 फेब्रुवारीच्या तारखेवर शिक्कामोर्तब करण्यात येईल. त्यानंतर 18 फेब्रुवारीपर्यंत स्थायी व शिक्षण समिती अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा विचार सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT