मुंबई

मुंबई : छटपूजेला परवानगी; कोरोना नियम पाळण्याचे पालिकेचे आवाहन

निलेश पोतदार

छटपूजा सण कोविड नियमांचे पालन करुन साजरा करण्यास मुंबई महानगरपालिकेने परवानगी दिली आहे. यासाठी नियमावली तयार करण्यात आली असून, भाविकांनी गर्दी मर्यादित ठेवण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. दरम्यान विभाग स्तरावर छटपूजेचे परवानगी मागणाऱ्या संस्थांना कृत्रिम तलाव स्वखर्चाने बांधण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव अजून पर्यंत कमी झालेला नाही. त्यामुळे छटपूजेला परवानगी न देण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. या विरोधात भाजपने जोरदार आवाज उठवला होता. भाजप प्रवक्ता भालचंद्र शिरसाट यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून छटपूजेला परवानगी देण्याची विनंती केली होती. अखेर महापालिका प्रशासनाने काही निर्बंध घालून छटपूजेला परवानगी दिली आहे.

10 ते 11 नोव्हेंबर असे दोन दिवस छटपूजा साजरी होणार आहे. छटपूजा ही समुद्रकिनारी, नदी व तलाव आदी ठिकाणी सूर्यास्त व सूर्योदयाच्या कालावधीत उत्तर भारतीय नागरिकांकडून केली जाते. परंतु कोरोनामुळे उद्भवणार्‍या संसर्गामुळे या पूजेवर काही निर्बंध लादण्यात आले आहेत.

SCROLL FOR NEXT