ST Employee Diwali Salary Pudhari
मुंबई

MSRTC Employee Salary | एसटी कर्मचाऱ्यांचा दिवाळीपूर्वी वेतनाचा मार्ग मोकळा; ३९१ कोटी मंजूर

एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांचे एसटी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

ST Employee Diwali Salary

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन देण्यासाठी राज्य सरकारने सप्टेंबर २०२६ मधील प्रवासी सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी ३९१ कोटींचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांचा वेतन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एसटी महामंडळातील सुमारे ८३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन साधारणतः दर महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान अदा केले जाते. मात्र, यंदा ६ नोव्हेंबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होत असल्याने कर्मचाऱ्यांना सणापूर्वीच वेतन मिळावे, यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी परिवहन विभाग आणि एसटी प्रशासनाने पाठपुरावा केला. शासनाच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीपूर्व वेतनासाठी निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा दिलासा मिळाला आहे.

कर्मचाऱ्यांच्या सणाच्या आनंदावर आर्थिक अडचणींचे सावट पडू नये, यासाठी शासन आणि एसटी प्रशासनाने समन्वयाने कार्यवाही करावी, अशी भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT