Mumbai Metro Pudhari File Photo
मुंबई

Mumbai Metro Timing: गणेशभक्तांसाठी मेट्रो मार्गिकांवर रात्री उशिरापर्यंत सेवा

मेट्रो ३ भुयारी मार्गिकेच्या आरे व कफ परेड या स्थानकांवरून रात्री १२ वाजता शेवटची मेट्रो सोडली जाईल.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: गणेशभक्तांच्या सोयीसाठी विविध मेट्रो मार्गिकांवरील सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व मेट्रो २अ, गुंदवली ते दहिसर पूर्व मेट्रो ७, दहिसर ते काशीगाव मेट्रो ९ तसेच महाराष्ट्र नगर-मंडाळे ते चेंबूर मेट्रो रब या मार्गिकांवरील शेवटची मेट्रो रात्री ११ वाजताऐवजी १२.३० वाजता सुटणार आहे.

मेट्रो ३ भुयारी मार्गिकेच्या आरे व कफ परेड या स्थानकांवरून रात्री १२ वाजता शेवटची मेट्रो सोडली जाईल. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ मार्गिकवरील सेवा रात्री १.०३ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

वर्सोवा ते घाटकोपर शेवटची मेट्रो रात्री १२.१५ वाजता सुटेल. घाटकोपर ते वर्सोवा शेवटची मेट्रो १२.४० वाजता सुटेल. घाटकोपरहून शेवटची मेट्रो वर्सोव्याला १:०३ वाजता पोहोचेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT