Mumbai Metro Pudhari
मुंबई

Mumbai Metro 5: मेट्रो-5चा पहिला टप्पा वर्ष अखेरीस सुरू होणार; ठाणे ते धामणकर नाका मार्गिकेवर लवकरच सीएमआरएस

यापूर्वी मेट्रो मार्ग 5 ची लांबी 22.38 किमी होती आणि 11.83 किमी लांबीच्या मेट्रो मार्ग 5अ च्या समावेशानंतर या संपूर्ण मार्गिकेची एकूण लांबी आता 34.21 किमी होणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मेट्रो 5 हा प्रकल्प आता नव्या टप्प्यात दाखल झाला आहे. विस्तारित टप्प्याला मंजुरी मिळाल्यानंतर या मार्गिकेची एकूण लांबी आता 34.21 किमी झाली असून ती महामुंबईतील सर्वात मोठ्या मेट्रो मार्गिकांपैकी एक ठरणार आहे.

या प्रकल्पाचा पहिला टप्पा आता सीएमआरएस तपासणीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून, प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे.

मेट्रो मार्ग 5 चा विस्तार असलेला मेट्रो मार्ग 5 अ ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि आसपासच्या वाढत्या विकास केंद्रांमधील संपर्कक्षमता मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे.

यापूर्वी मेट्रो मार्ग 5 ची लांबी 22.38 किमी होती आणि 11.83 किमी लांबीच्या मेट्रो मार्ग 5अ च्या समावेशानंतर या संपूर्ण मार्गिकेची एकूण लांबी आता 34.21 किमी होणार आहे.

विस्तारीकरणानंतर मेट्रो 5 प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च 18,130 कोटी इतका आहे. या वर्षाअखेर टप्पा 1 सुरू होणे अपेक्षित असून त्यामुळे या संपूर्ण पट्ट्यातील प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार असून नव्या मंजुरींमुळे या मार्गिकेची व्याप्ती व प्रभाव दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT