Arrested Pudhari
मुंबई

Antop Hill MD Seizure: अँटॉप हिलमध्ये ४४ लाखांचे एमडी जप्त; दोघांना अटक

अमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई; १४७ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या (एएनसी) वांद्रे पथकाने अटक केली. अँटॉप हिल येथील जी. टी. बी. नगर परिसरात शनिवारी रात्री केलेल्या कारवाईत आरोपींकडून एकूण १४७ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या एमडीची किंमत सुमारे ४४ लाख १० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस पथक शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास जी. टी. बी. नगर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन व्यक्तींवर पोलिसांची नजर गेली. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे मेफेड्रोन हा अंमली पदार्थ आढळून आला. त्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आतिफ नबील शेख (२२) आणि मन्सुर मोहम्मद शेख (३०) अशी आहेत. दोघेही अँटॉप हिल परिसरातील रहिवासी आहेत. आतिफ शेख याच्याकडून ७८ ग्रॅम, तर मन्सुर शेख याच्याकडून ६९ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. या प्रकरणी आरोपींविरुद्ध अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी आणि सहायक पोलीस आयुक्त सुधीर हिर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे एएनसीचे प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT