Mumbai Mayor Social Media Expense Pudhari
मुंबई

Mumbai Mayor Social Media Expense: महापौरांच्या सोशल मीडिया हाताळणीकरिता २५ लाख रुपयांचा खर्च

महापौर रितू तावडे यांचे दैनंदिन कार्यक्रम,भेटी-गाठी, पाहणी दौरे सोशल मिडियावर सर्वत्र प्रसिद्ध करण्यासाठी महापौर कार्यालयासाठी एक टिम तैनात करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: महापौर बंगला दुरुस्ती, स्वीय सहाय्यक यांना महिन्याला ५० हजार वेतन यासाठी करोडो रूपये खर्च सुरु असतांना, आता महापौर रितू तावडे यांचे सोशल मिडिया हाताळणीकरिता एका वर्षासाठी २५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. तसा प्रशासनाने तयार केला असून प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी येणार आहे.

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या कामकाज, कार्यक्रमातील उपस्थिती तसेच त्यांचा सहभाग आदींची माहिती विविध समाजमाध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचली जावी, यासाठी महापौर कार्यालयासाठी समाजमाध्यम हाताळणीकरता व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने संस्थेची निवड करण्यात आली असून एक वर्षांच्या कालावधीसाठी २५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

रनटाईम सोल्यूशन्सची निवड

महापौर रितू तावडे यांचे दैनंदिन कार्यक्रम,भेटी-गाठी, पाहणी दौरे सोशल मिडियावर सर्वत्र प्रसिद्ध करण्यासाठी महापौर कार्यालयासाठी एक टिम तैनात करण्यात आली आहे. या टिमची मुदत वाढवण्यात आली आहे .१ ऑगस्ट २०२६ ते ३१ जुलै २०२७ या कालावधीत या टीमची सेवा घेतली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. यासाठी २५ लाख १२ हजार ७८६ रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT