Mumbai Mayor Office Bomb Threat Pudhari
मुंबई

Mumbai Mayor Office Bomb Threat: मुंबई महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

ई-मेलमध्ये शाळेवर ग्रेनेड हल्ला आणि महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात स्फोट घडवण्याचा दावा; धमकीच्या सत्यतेचा तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने खळबळ उडाली आहे.धमकीच्या ई-मेलमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी एका शाळेवर ग्रेनेड हल्ला आणि २७ नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात बॉम्बस्फोट घडवण्याचा दावा करण्यात आला आहे.

या ई-मेलमध्ये खलिस्तान आणि काही संघटनांची नावे घेण्यात आली असून, ई-मेल प्राप्त होताच मुंबई पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

पोलिसांकडून ई-मेलची सत्यता, तो कोणी आणि कुठून पाठवला आणि हा खरा धोका आहे का, की केवळ अफवा पसरवण्याचा प्रयत्न आहे, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. महापौर कार्यालय, महालक्ष्मी रेसकोर्स आणि शाळांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT