Mumbai Mayor Bomb Threat pudhari
मुंबई

Mumbai Mayor Bomb Threat: मुंबई महापौरांच्या कार्यालयात खळबळ... मुलांना शाळेत पाठवू नका.. १५ ऑगस्टपूर्वी मोठं काहीतरी होणार

Anirudha Sankpal

Mumbai Mayor Bomb Threat: मुंबईच्या महापौरांना पुन्हा एकदा बॉम्बची धमकी आलेली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत ई-मेल अकाऊंटवर त्यांचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. महापौरांच्या कार्यालयासोबतच मुंबई मेट्रो, शाळा, शेअर बाजार देखील उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. १५ ऑगस्टपूर्वी हा सोफ्ट घडवून आणला जाईल असा दावा या ई-मेलमध्ये करण्यात आला आहे.

या मेलमध्ये खलिस्तान समर्थक घोषणा आणि काही व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली आहेत त्यामुळं या मेलचं गांभीर्य अधिक आहे. या ई-मेलमध्ये मुलांना शाळेत पाठवू नका, मेट्रोने प्रवास करू देऊ नका असा इशारा देखील देण्यात आला आहे.

यापूर्वी मुंबईच्या महापौरांना दोनवेळा धमकीचा ई-मेल आला होता. या धमकीच्या मेलनंतर मुंबई पोलीस सतर्क झाली असून त्यांना याचा तपास सुरू केला आहे. ई-मेल कोणत्या आयपी अॅड्रेसवरून पाठवण्यात आला आहे. याचा सोर्स काय आणि हा कोणी पाठवला आहे याचा शोध सायबर पोलिसांकडून घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT