मुंबई ः व्हलेंटाईन डेच्या निमित्त दुकानांतील विविध आकर्षक गिफ्ट वस्तू. pudhari photo
मुंबई

‌Valentine Day Celebration : ‘व्हॅलेंटाईन डे‌’निमित्त प्रेमवीरांसाठी सजल्या मुंबईतील बाजारपेठा

कपल स्टॅच्यू, हार्ट सॉफ्टटेडीसह लव कार्ड, सिल्क हार्ट चॉकलेटला ग्राहकांची पसंती

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : ‌‘व्हॅलेंटाईन डे‌’च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बाजारपेठेत कपल स्टॅुच्यु, हार्ट सॉफ्ट टेडिसह लव्हकार्डसह सिल्क हार्ट चॉकलेटला ग्राहकांची पसंती मिळत आहे.

दरवर्षी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा होतो. पण; तो विविध पद्धतीने आठवडाभर साजरा केला जातो. बाजारपेठेत प्रेमपत्र, विविध प्रकारचे टेडी, प्लॉवर मग सेट, विविध फ्रेम, परफ्युम, वर्षभर प्रेमाबद्दल असलेले मेसेज बुक उपल्बध आहेत. प्रेमाबद्दल सांगणारे 365 दिवसाचे मेसेज असणारे बुक 400 रुपयांना, टेडी चॉकलेट कॉम्बो बॉक्स 1 हजार रुपयांना, आणि आय लव्ह यू, लव, स्वीट, हॅप्पी, हार्ट सॉफ्ट अशा नावाच्या टेडी तर वैविध्यपूर्ण ग्रिटिंग्ज 20 रुपयांपासून ते 250 रूपयांपर्यंत उपलब्ध आहेत. हार्ट सॉफ्ट टेडीला ग्राहकांची पसंती असून सर्व प्रकारच्या गिफ्टचे दर स्थिर आहेत. गतवर्षी इतकेच त्यांचे दर आहेत, असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

याबाबत चर्चगेट येथील विक्रेते जिग्नेश भेदा म्हणाले, व्हॅलेंटाईन डेचे दिवसेंदिवस महत्त्व कमी होत आहे. त्यामुळे गिफ्ट घेणाऱ्या ग्राहकांची संख्या घटत आहे. शेवटचे तीन दिवस व्हॅलेंटाईन डेच्या गिफ्ट वस्तुला मागणी असते.

दुसरीकडे; अनेक ग्राहक ऑनलाईनद्वारे गिफ्टची मागणी करत असल्याने शॉपीमध्ये ग्राहकांची गर्दी नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. व्हॅलेंटाईन डे साजरा करणे म्हणजे पाश्चिमात्य देशाचे अनुकरण अशी टीका समाजातील विविध घटकांकडून यापुर्वी होत होती. पण; आता व्हलेंटाईन डेचे प्रमाण कमी झाल्याचेही अनेक विक्रेते सांगतात.

  • वस्तू किंवा साहित्य घरपोच मिळावे यासाठी ग्राहक हे ऑनलाईनचा वापर करताना दिसतात. अनेकजण गिफ्ट या घरी मागवून घेत असल्याने गिफ्ट शॉपीमध्ये ग्राहकांची फारशी गर्दी नसल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT