Mumbai Local Train Crime News Puadhri
मुंबई

Mumbai Local Crime: लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून वाद, मुंबईत ट्रेनमध्ये तरुणाची हत्या; व्हिडिओ समोर

Borivali Local Crime News: लोकलच्या डब्यात भर गर्दीत रक्तरंजित थरार

पुढारी वृत्तसेवा

Churchgate-Nallasopara Local Train Crime Video

मुंबई : मुंबईकरांची लाईफ लाईन असलेल्या मुंबई लोकलमध्ये सकाळी भर गर्दीच्या वेळी एका तरुणाची किरकोळ वादातून चाकूने हत्या केल्याची घटना घडली. मुसळधार पावसात लोकलच्या डब्याचा दरवाजा बंद केल्याने झालेल्या अत्यंत किरकोळ कारणावरून वाद झाला. आणि या वादाचे रूपांतर थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या घटनेचे व्हिडिओ वाऱ्यासारखे सर्वत्र व्हायरल झाले आहेत. त्यामुळे बुधवारी भर गर्दीत कामावर निघालेल्या मुंबईकर या घटनेने धास्तावले आहेत. धावत्या लोकलमध्ये झालेल्या या रक्तरंजित थरारामुळे मुंबईकरांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक बुधवारी मंदावली होती. त्यामुळे रेल्वे डब्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होती. अशात चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करणाऱ्या मयंक लोहार (२२ वर्ष) या तरुणाचे दुसऱ्या एका प्रवाशासोबत भांडण झाले जोराचा पाऊस सुरू असल्याने लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून हा वाद सुरू झाला. आणि पाहता पाहता या वादात आरोपीने मयंकच्या पोटात सपासप चाकूने वार केले. त्याला रक्ताळलेले पाहून डब्यातील इतर प्रवाशांनी तेथून पळ काढला. हातात सुरा घेऊन रक्ताळलेल्या मयंकाला तो पुन्हा पुन्हा धमकावत होता. अखेर बोरिवली स्थानकावर लोकल पोहोचताच आरोपी पळून गेला.

दरम्यान, काही प्रवाशांनी या घटनेची खबर रेल्वे स्थानकावर पोलिसांना दिल्याने रेल्वे पोलिसांनी तात्काळ उपचारासाठी मयंकचा जवळील रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. मयंकचा मृत्यू झाल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. आरोपीचा शोध घेण्यासाठी सहा पोलिसांचे पथक तपास करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT