Sunday Mega Block Mumbai pudhari photo
मुंबई

Mumbai Mega Block: सीएसएमटी - विद्याविहार दरम्यान उद्या मेगा ब्लॉक

CSMT ते विद्याविहारदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवणार; ठाणे-वाशी/पनवेल ट्रान्स-हार्बर सेवा रद्द

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेकडून रविवारी'मेगा ब्लॉक' घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यानच्या 'अप' आणि 'डाउन' धिम्या मार्गांवर तसेच ट्रान्स-हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यानच्या 'अप' आणि 'डाउन' मार्गांवर असणार आहे.

या ब्लॉकमुळे सीएसएमटीहून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ या वेळेत सुटणाऱ्या लोकल सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान जलद मार्गावरून वळवण्यात येतील. घाटकोपरहुन सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ या वेळेत सुटणाऱ्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील.

ट्रान्स-हार्बर मार्ग :

ब्लॉक कालावधीत ठाणे व वाशी/पनवेल स्टेशनदरम्यानच्या अप व डाउन ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल बंद राहतील. ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ या वेळेत वाशी/पनवेल येथे जाणाऱ्या रेल्वे सेवा रद्द राहतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT