Sunday Mega Block Mumbai pudhari photo
मुंबई

Sunday Mega Block Mumbai : मध्य, हार्बर रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक

माटुंगा-मुलुंडसह कुर्ला-वाशी सेवांवर परिणाम

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानका दरम्यान आणि हार्बर लाईनवर कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे सीएसएमटी येथून सकाळी सुटणाऱ्या जलद लोकल माटुंगा स्थानकावर धिम्या मार्गावर वळवल्या जातील.

ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या लोकल मुलुंड स्थानकावर धिम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. खोपोली येथून दुपारी १.४८ वाजता सुटणारी खोपोली - सीएसएमटी लोकल पुनःनिर्धारित वेळेनुसार दुपारी २.०६ वाजता सुटणार आहे.

सांताक्रूझ आणि गोरेगाव दरम्यान रात्र ब्लॉक

रेल्वे ट्रॅक, सिग्नलिंग प्रणाली व ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वेकडून आज २४/ २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री सांताक्रूझ आणि गोरेगाव दरम्यान जलद मार्गांवर पाच तासांचा 'जंबो ब्लॉक' घेण्यात येणार आहे. शनिवार मध्यरात्री १२:३० ते रविवार पहाटे ४:३० या वेळेत दोन्ही जलद मार्गांवर हा ब्लॉक असणार आहे.

या ब्लॉकच्या कालावधीत सर्व जलद लोकल गाड्या सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावरून वळवण्यात येणार आहे. तर काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र रविवार, २५ ऑक्टोबर रोजी दिवसा कोणताही ब्लॉक नसणार आहे.

पनवेल-वाशी विशेष सेवा

कुर्ला ते वाशी दरम्यान हार्बर लाईनवर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक आहे. या दरम्यान सीएसएमटी येथून वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या लोकल तसेच पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटी येथे येणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल- वाशी दरम्यान विशेष लोकल चालविल्या जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT