Tiger Shroff Firing Case : संशयित आरोपींचा आरे कॉलनी परिसरातही गोळीबाराचा सराव

जतिन पांचाळ याने गोळीबारात वापरण्यात आलेली शस्त्रे उपलब्ध करून दिल्याचा संशय
Tiger Shroff Firing Case
Tiger Shroff Firing CasePudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर जुहू येथे झालेल्या गोळीबारापूर्वी आरे कॉलनी परिसरातही कथित गोळीबाराचा सराव झाल्याचा संशयही तपास यंत्रणेने व्‍यक्त केला. दरम्यान, आरोपी अनिल पंडित याच्याशी थेट संपर्क असणाऱ्या अंकित खटक, समीर खत्री आणि जतिन पांचाळ या आणखी तीन आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यांना एस्प्लनेड न्यायालयाने २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

न्यायालयातील सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने पोलीस कोठडीच्या मागणीला विरोध केला. तिन्ही आरोपी घटनास्थळी उपस्थित नव्हते, तसेच पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण आणि हॉटेलची नोंदवही यांसारखे पुरावे आधीच ताब्यात घेतले आहेत, असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला.

Tiger Shroff Firing Case
Free Food Grains Scheme : दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये मोफत धान्य देण्याचे आदेश

रेकीसाठी मुंबईत आल्याचा संशय

तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, अंकित खटक गोळीबारापूर्वी मुंबईत येऊन रेकी करून गेल्याचा संशय आहे. समीर खत्री याचा फरार आरोपी अनिल पंडितशी संपर्क असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. जतिन पांचाळ याने गोळीबारात वापरण्यात आलेली शस्त्रे उपलब्ध करून दिल्याचा संशय आहे.

Tiger Shroff Firing Case
Free Food Grains Scheme : दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये मोफत धान्य देण्याचे आदेश

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news