मुंबई: रेल्वेने मुंबई विभागातील तिन्ही उपनगरीय मार्गांवर रविवारी 12 एप्रिल रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मेगाब्लॉक घेतला आहे. मध्ये रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवरछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान अप व डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वेने सांताक्रुझ आणि गोरेगाव दरम्यान अप व डाऊन मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला आहे.
मध्य रेल्वे
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते दुपारी 15.45 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते विद्याविहार दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. तर घाटकोपर येथून सकाळी 10.19 ते दुपारी 3.52 वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई दरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील.
हार्बर लाईन
कुठे : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी / बांद्रा (डाऊन)
कधी : सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40
कुठे : चुनाभट्टी / बांद्रा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (अप)
कधी : सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10
कुठे : पनवेल / बेलापूर / वाशी
कधी : सकाळी 9.53 ते दुपारी 3.20
कुठे : गोरेगाव ते बांद्रा
कधी : सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13
विशेष गाड्या
ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येतील.