Local Train Pudhari
मुंबई

Mega Block: मुंबईकरांनो, रविवारी लोकलचे वेळापत्रक बदलणार! मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, प्रवासापूर्वी वाचा

: मुंबई लोकल मेगा ब्लॉक ११ ऑक्टोबरला

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान आणि हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी- वांद्रे स्थानकांदरम्यान रविवार, ११ ऑक्टोबर रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा धावणार आहेत.

हा ब्लॉक माटुंगा-मुलुंड स्थानकांदरम्यान दोन्ही धीम्या मार्गांवर सकाळी ११.०५ ते दुपारी १५.५५ वाजेपर्यंत राहणार आहे. ठाणे येथून सकाळी ११.०७ ते दुपारी १५.५१ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या लोकल मुलुंड स्थानकावर 'अप' जलद मार्गावर वळवल्या जातील.

त्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला व सायन स्थानकांवर थांबतील. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे ते सीएसएमटी दरम्यान 'अप' मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ब्लॉक असेल. सीएसएमटीहुन वाशी/बेलापूर/पनवेल आणि वांद्रे आणि येणाऱ्या हार्बर लोकल ब्लॉक दरम्यान रद्द राहतील.

माहीम-मुंबई सेंट्रल दरम्यान रात्रीचा ब्लॉक

रेल्वे रुळ दुरुस्ती, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी शनिवार आणि रविवार असा मध्यरात्रीचा माहीम मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यानच्या पश्चिम उपनगरीय रेल्वेकडून मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. १० आणि ११ ऑक्टोबर दरम्यान मध्यरात्री ००:२५ ते ०४:२५ पर्यंत माहीम आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान हा ब्लॉक असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT