Mumbai Indians vs UP Warriors WPL Pudhari
मुंबई

Mumbai Indians vs UP Warriors WPL: मुंबई इंडियन्स आज यूपी वॉरियर्सशी आमनेसामने

महापालिका निवडणुकांमुळे सामना प्रेक्षकांविना होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज (दि. 15) मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात लढत होणार आहे. मात्र,आजच महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होत असल्याने, हा सामना प्रेक्षकांविना खेळवला जाण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक ड्युटीमुळे सामन्यासाठी पुरेसा बंदोबस्त पुरवणे शक्य नसल्याचे स्थानिक पोलिसांनी ‌‘बीसीसीआय‌’ला कळवले आहे.

येथील डी. वाय. पाटील स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी पूरक मानली जाते. सुरुवातीच्या षटकांत वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. मात्र, एकदा स्थिरावल्यानंतर फलंदाज येथे मोठे फटके खेळू शकतात.

या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 165 ते 168 च्या दरम्यान असते. मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यातील आतापर्यंतच्या 7 सामन्यात मुंबई इंडियन्सने 5 सामन्यात विजय मिळवून वर्चस्व राखले तर यूपी वॉरियर्सला 2 सामन्यांत विजय मिळवता आला आहे.

आजचा सामना

मुंबई इंडियन्स महिला वि. यूपी वॉरियर्स महिला

वेळ : सायंकाळी 7.30 वाजता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT