HSRP number plate
मुंबई: उद्यापासून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) बंधनकार असेल. याआधी पाच वेळा मुदतवाढ दिली असून पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही, आता ठोस कारवाई केली जाणार, असे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज (दि. ३०) स्पष्ट केले.
१ एप्रिल २०१९ नंतरच्या नव्या वाहनांना कंपनीकडून नंबर प्लेट मिळत होती. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत झालेल्या सर्व वाहनांना आता (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र शहरातील अनेक वाहने हे विना एचएसआरपी नबंरप्लेटशिवाय धावत आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही एचएसआरपी नबंर प्लेटबाबत वाहनधारकांमध्ये उदासीनता दिसून येत असून, आज (दि. ३०) जून रोजी नंबरप्लेट बसविण्याची मुदत संपत आहे.
परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ३१ डिसेंबर २०१९ अखेर सुमारे १४ लाख ६७ हजार ७४२ वाहने नोंदणीकृत होती. या वाहनांना सुरक्षेच्या दृष्टीने एचएसआरपी नबंर प्लेट बसविणे बंधनकारक आहे. आधिकृत आकडेवारीनुसार, नोंदणीकृत वाहनांपैकी १० जून २०२६ पर्यंत केवळ ६ लाख २८ हजार ६२४ वाहनमालकांनी एचएसआरपी बसविण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. यामधील केवळ ५ लाख २६ हजार ७२० वाहनांवरच प्रत्यक्ष एचएसआरपी बसविण्यात आली आहे. सुमारे ८ लाख ३९ हजार वाहनांनी एचएसआरपीसाठी अद्याप नोंदणीच केली नाही.
नोंदणी केलेल्या वाहनधारकांना अद्याप नबंर प्लेट बसवून घेतलेली नाही. शहरात अजूनही लाखो वाहने एचएसआरपी नंबरप्लेटविना रस्त्यावर धावत आहे. अनेकदा मुदतीवाढ देऊनही निम्म्याहून अधिक वाहन चालकांनी ही प्रकिया पूर्ण केली नसल्याचे आकडेवारीवरुन निर्देशनास येत आहे.