Bombay High Court Pudhari
मुंबई

Ganeshotsav Firecracker Ban: सार्वजनिक रस्त्यांवर प्रदूषक फटाके फोडण्यावर बंदी घालण्याचे हायकोर्टाचे संकेत

गणेशोत्सवातील वाढत्या प्रदूषणावर ताशेरे; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

​मुंबई: गणेशोत्सवासह विविध उत्सवांच्या काळात सार्वजनिक रस्त्यांवर ध्वनिवर्धकाचा अनियंत्रित वापर आणि फटाकाच्या आतषबाजीमुळे होणाऱ्या ध्वनी आणि वायू प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली.

न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉक्टर नीला गोखले यांच्या खंडपीठाने गणेशोत्सवासह आगामी सण उत्सवाच्या काळात सार्वजनिक रस्त्यावर होणाऱ्या फटाक्यांचा वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचे संकेत दिले.

​सण आणि उत्सवांच्या काळात मोठ्या आवाजातील ध्वनीप्रक्षेपके (साऊंड सिस्टीम), फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू व ध्वनी प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली.

यावेळी खंडपीठाने सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवासह इतर कोणताही सणातील उत्सव हे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचवण्यासाठी किंवा त्यांच्या मृत्यूला कारणीभूत करण्यासाठी नसतात. अनियंत्रित ध्वनी आणि पर्यावरण प्रदूषणामुळे शांततेत जगणाऱ्या सामान्य नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.

सरकारचे उत्तर

यावेळी राज्य सरकारच्या वतीने ॲडव्होकेट जनरल डॉक्टर मिलिंद साठे यांनी सांगितले की, राज्यात पोलिस महासंचालकांच्या सूचनेनुसार मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणारे कोणतेही वाद्य अथवा ध्वनी प्रक्षेपकांवर बंदी घालण्यात आली आहे. नागपूर आणि सोलापूरमध्ये गणेशाच्या काळात डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईट व निर्बंध घालण्यात आले असल्याचे मान्य केले.

आधी परवानगी दाखवा

याची दखल घेत खंडपीठाने ॲमिकस क्युरी (न्यायालयाचे मित्र) ज्येष्ठ वकील ॲड. एस पी जुना आहे आणि ॲड. आनंद यांनी केलेल्या सूचनांचा विचार करून सर्व कार्यक्रम स्थळावर आणि मिरवणुकीत त्यांना दिलेली दोन्ही प्रक्षेपक वापरण्याची परवानगी प्रदर्शित करणे अनिवार्य करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले जातील.

याबरोबरच ठाण्यातील जनहित याचिकाकर्ते डॉ. महेश बेडेकर यांच्या वतीने ज्येष्ठ वकील संजीव गोरवाडकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची दखल घेत, ध्वनी निर्माण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिलेंडर्सच्या वापरावरही बंदी घालण्याच्या या दृष्टीने आदेश दिला जाईल असे स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT