Mira Road School Food Controversy: डब्यात मेथीची भाजी आणली म्हणून विद्यार्थ्याला ५० रुपयांचा दंड; मीरारोडमधील शाळेचा प्रकार

पर्युषण पर्वातील आहार निर्बंधावरून वाद; महापालिकेच्या शिक्षण विभागाची तपोवन शाळेला कारणे दाखवा नोटीस
Food Controversy
Food ControversyPudhari
Published on: 
Updated on: 

भाईंदर: मिरा-भाईंदरमध्ये परधर्मियांच्या आक्रमणामुळे स्थानिक लोकांच्या आहारावर गदा आणली जात असतानाच आता ही आहारबंदी थेट जैन धर्मियांच्या शाळेत पोहोचली आहे. ऐन पर्युषण पर्वात जेवणाच्या डब्यात मेथी आणली म्हणून एका विद्यार्थ्याला मीरारोडच्या तपोवन शाळेत ५० रुपयांचा दंड आकारण्यात आला.

मिराभाईंदरमध्ये आधीच प्रत्येक वर्षीच्या पर्युषण पर्वात मांस विक्रीला खो घातला जातो. त्‍यात नरेंद्र मेहता यांच्या मीरारोड येथील सेव्हन स्क्वेेअर अकॅडमी शाळेत तर यंदाच्या पर्युषण पर्वात विद्यार्थ्यांच्या आहारावर निर्बंध आणले गेले. . तसे परिपत्रकच शाळा व्यवस्थापनाकडून काढण्यात आले. त्याला मनसेने विरोध करताच हे परिपत्रक मागे घेण्यात आले.

Food Controversy
Ganesh Idol Photo Ban: विसर्जन केलेल्या गणेशमूर्तींचे फोटो काढण्यास मुंबईत बंदी!पोलिसांचा आदेश

आता मीरारोडच्याच तपोवन या जैन धर्मिय व्यवस्थापन असलेल्या शाळेत विद्यार्थ्यावर पर्युषण पर्वात काय खावे, काय खाऊ नये, त्यावर निर्बंध घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला. एका विद्यार्थ्याने जेवणाच्या डब्यात मेथीची भाजी आणल्याने त्याला ५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्याला इतर सर्व धर्मियांनी तीव्र विरोध करीत संताप व्यक्त केला आहे.

कोणी काय खावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार असून विद्यार्थ्यांवर विशिष्ट खाद्यसंस्कृती लादली जात आहे, ती आम्ही कदापी मान्य करणार नाही, असा इशारा मनसेचे रॉबर्ट डिसोझा यांनी दिला.

पालिकेच्या शिक्षण विभागासह शासकीय शिक्षण विभागाकडून कठोर कारवाई करुन सेव्हन स्क्वेेअर अकॅडमी व तपोवन शाळेची नोंदणी रद्द करण्याची मागणी मराठी एकीकरण समितीकडून करण्यात आली आहे.

Food Controversy
Forest Medicinal Plants: सह्याद्रीच्या जंगलात रानऔषधींचा खजिना! आदिवासी कुटुंबांना उत्पन्नाची नवी संधी

मेथीवर बंदी आणा : राऊत

'आता सरकारने मेथीच्या भाजीवरच अधिकृतपणे बंदी आणायला हवी ', अशी खोचक टिप्पणी शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी केली. आ. अंबादास दानवे यांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. 'बरं झालं बिचाऱ्याने पिझ्झा, बर्गर आणला नाही, नाहीतर शाळेने थेट आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन सत्कारच केला असता ', असा टोला त्‍यांनी लगावला.

तपोवनला 'कारणे दाखवा नोटीस'

मनसेच्या तक्रारीची दखल घेत मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने तपोवन विद्यालयाला 'कारणे दाखवा नोटीस' बजावली आहे. विद्यार्थ्यांच्या आहारावर असे निर्बंध लादणे आणि दंड वसूल करणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे पालिकेने नोटिशीमध्ये नमूद केले आहे. विद्यार्थ्यांच्या आहारावर असे निर्बंध लादणे आणि दंड वसूल करणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे पालिकेने नोटिशीमध्ये नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news