Heatwave Alert Pudhari
मुंबई

Mumbai Heatwave: मुंबईत उष्णतेची लाट कायम! तापमान ३६ अंश पार, नागरिक हैराण

सांताक्रूझ वेधशाळेमध्ये शनिवारी किमान 26 आणि कमाल 35 अंश सेल्सिअस तापमान होते.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: पारा पस्तिशीपार असल्याने मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील उष्णतेच्या लाटेचा प्रभाव रविवारीही कायम राहण्याची शक्यता आहे. गुरुवारपासून सरासरी कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसदरम्यान आहे. सांताक्रूझ वेधशाळेमध्ये शनिवारी किमान 26 आणि कमाल 35 अंश सेल्सिअस तापमान होते.

त्यामुळे तिसऱ्या दिवशीही उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवला. उष्णतेसह आर्द्रतेचे प्रमाण वाढले असून दुपारच्या कडक उन्हामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. रविवारी (36 अंश सेल्सिअस) कमाल तापमानात आणखी वाढ होणार असल्याने उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे.

आयएमडीच्या हवामान बुलेटिननुसार, राज्याच्या बहुतांश भागात कोरडे हवामान कायम राहण्याची शक्यता असून, अंतर्गत भागांमध्ये उष्णतेची पातळी वाढलेली राहील. अनावश्यक घराबाहेर पडू नका, असे आवाहन महानगरपालिकेने केल आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT