girl jumps from local train vashi bridge file photo
मुंबई

Navi Mumbai News: प्रियकराने ब्लॉक केल्याने तरुणीने धावत्या ट्रेनमधून वाशीच्या खाडीत मारली उडी

प्रियकराने सोशल मीडियावर 'ब्लॉक' केल्याच्या रागातून एका तरुणीने धावत्या रेल्वेमधून समुद्रात उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.

पुढारी वृत्तसेवा

Navi Mumbai girl jumps from local train vashi bridge

नवी मुंबई: प्रियकराने सोशल मीडियावर 'ब्लॉक' केल्याच्या रागातून एका तरुणीने धावत्या रेल्वेमधून समुद्रात उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. वाशी खाडी पुलाजवळ आज सकाळी ८:३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. सुदैवाने, तिथे उपस्थित असलेल्या देवदूत ठरलेल्या मच्छीमारांमुळे या तरुणीचे प्राण वाचले आहेत.

पीडित तरुणी चेंबूर परिसरातील रहिवासी आहे. आज सकाळी ती हार्बर लाईनच्या लोकलने प्रवास करत असताना, वाशी खाडी पुलावर रेल्वे येताच तिने दरवाजातून थेट खाडीच्या पाण्यात उडी मारली. तरुणीने पाठीवर बॅग लटकवलेली असल्याने ती पाण्यात बुडण्याऐवजी काही काळ पाण्यावर तरंगत राहिली.

मच्छीमार ठरले 'देवदूत'

त्याच वेळी वाशी गावातील मच्छीमार महेश सुतार आणि त्यांचे सहकारी खाडीत मासेमारी करत होते. एका तरुणीने धावत्या ट्रेनमधून उडी घेतल्याचे लक्षात येताच, त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपली बोट त्या दिशेने वळवली. जीवाची बाजी लावून या मच्छीमारांनी तरुणीला सुखरूप पाण्याबाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तरुणीला ताब्यात घेतले.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत "प्रियकराने आपल्याला कोणतेही कारण न देता सोशल मीडियावर ब्लॉक केले, याचा मानसिक त्रास झाल्याने आपण हे टोकाचे पाऊल उचलले," अशी कबुली तरुणीने दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT