Mental Health Habits: मन शांत ठेवण्यासाठी काय करावे? मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले ६ सोपे उपाय

पुढारी वृत्तसेवा

मानसोपचार तज्ज्ञांनी मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तीन साधे नियम सांगितले आहेत.

तुमची रोजची दिनचर्या तुम्हाला आधार देते. रोज ठराविक वेळी उठणे, जेवणे, व्यायाम आणि झोपणे यांमुळे मेंदूला सुरक्षिततेची भावना मिळते, ज्यामुळे अस्वस्थता कमी होण्यास मदत होते.

दिवसभरातून काही मिनिटे स्वतःसाठी काढा. मग ते दीर्घ श्वास घेणे असो, योगासने असो किंवा अगदी शांत बसणे असो. हे छोटे ब्रेक शरीरातील तणाव कमी करून भावनिक आरोग्य सुधारतात.

चिंतेमुळे अनेकदा माणूस एकाकी पडतो. अशा वेळी विश्वासू मित्र किंवा कुटुंबीयांशी संवाद साधा. आपल्या मनातील भीती बोलून दाखवल्याने तिचा मनावरचा ताण कमी होतो.

दिवसभर बातम्या आणि सोशल मीडियाचा मारा सहन करण्यासाठी मानवी मेंदू बनलेला नाही. सततच्या नकारात्मक बातम्यांमुळे भीती वाढते. त्यामुळे बातम्या पाहण्याची किंवा वाचण्याची एक वेळ निश्चित करा.

जे डोळ्यांसमोर आहे (वर्तमान), त्यावरच लक्ष केंद्रित करा. फार लांबचा विचार करू नका.

सध्या तुम्ही जिथे आहात, त्या परिस्थितीचा स्वीकार करा आणि तुम्ही जे करत आहात त्यात आनंद माना.