Flower Price Rise Pudhari
मुंबई

Marigold Flower Price: नवरात्रोत्सवातही झेंडूचे दर घसरले! शेतकऱ्यांना किलोमागे अपेक्षित उत्पन्न नाही

मुंबईच्या बाजारात नाशिक, पुणे, सांगलीसह विविध भागांतून फुलांची आवक; दर घसरल्याने शेतकऱ्यांना फटका

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: नवरात्रोत्‍सवा फुलांना मोठी मागणी असताना बाजारात फुलांची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. विशेषतः झेंडूच्या फुलांचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र आहे. घाऊक बाजारात झेंडूचा दर सुमारे ४० रुपये किलो असून, किरकोळ बाजारात तो ६० ते ७० रुपये इतका आहे.

मुंबईतील फुलांच्या बाजारात नाशिक, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि जुन्नर या भागांतून मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होत आहे. यंदा फुलांचे उत्पादन व बाजारातील आवक वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा कमी दरावर समाधान मानावे लागत आहे.

बाजारात पांढऱ्या शेवंतीला १६० ते २०० रुपये किलो, तर पिवळ्या शेवंतीला १२० ते १५० रुपये किलो दर मिळत आहे. गुलाबाच्या फुलांचा एक बंडल ६० ते ८० रुपयांना, तर किलोचा दर ८० ते १०० रुपये आहे.

यंदा पाऊस नसल्यामुळे विविध भागांतून फुलांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. आवक वाढल्याने झेंडूचे दर घसरले आहेत.
- राहुल खांडगे, फुल व्यापारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT