Mumbai Blood Shortage: मुंबईत रक्ताचा तुटवडा? गंभीर रुग्णांसाठी योग्य रक्तघटक मिळवताना प्रतीक्षा

बी पॉझिटिव्ह गटाच्या सहा युनिट पीआरबीसीसाठी शोधाशोध; ए पॉझिटिव्ह रक्त मिळवण्यासाठीही कुटुंबीयांचे प्रयत्न
Blood
BloodPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: गंभीर रुग्णांच्या उपचारांसाठी आवश्यक रक्त आणि लाल रक्तपेशी मिळवताना नातेवाइकांची दमछाक होत असल्याची दोन प्रकरणे परळ येथील केईएम रुग्णालयात समोर आली आहेत.

त्‍यामुळे मुंबईत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे का? अशी चर्चा वैद्यकीय वर्तुळात सुरू आहे. यासंदर्भात राज्य रक्त संक्रमण परिषदेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, प्रतिसाद मिळाला नाही.

या प्रकरणांपैकी एका महिला रुग्णासाठी ‘बी पॉझिटिव्ह’ गटाच्या सहा युनिट लाल रक्तपेशींची (पीआरबीसी) गरज असताना तीन दिवसांपासून त्यासाठी शोधाशोध सुरू होती. तर दुसऱ्या प्रकरणात ज्येष्ठ रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी ‘ए पॉझिटिव्ह’ गटाचे दोन युनिट रक्त मिळवण्यासाठी कुटुंबीयांना तीन दिवस प्रयत्न करावे लागले.

अखेर चौथ्या दिवशी रक्ताची व्यवस्था झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली. या घटनांमुळे गरजेच्या वेळी रक्तघटक उपलब्ध होण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Blood
MPSC Inquiry: एमपीएससीचे पूर्णतः शुद्धीकरण करा! अभय वाघ यांना रजेवर पाठविण्याची रोहित पवारांची मागणी

सहा युनिट रक्तपेशींसाठी तीन दिवसांपासून शोध

केईएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिला रुग्णाला ‘बी पॉझिटिव्ह’ गटाच्या सहा युनिट पीआरबीसीची आवश्यकता आहे. रुग्णाच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, रक्तपेशी मिळवण्यासाठी ते गेल्या तीन दिवसांपासून विविध ठिकाणी चौकशी करत आहेत. मात्र, आवश्यक रक्तपेशी अद्याप उपलब्ध झालेल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.

गंभीर परिस्थितीत उपचारांसाठी आवश्यक रक्तघटक मिळवताना नातेवाइकांना किती धावपळ करावी लागते, हे या प्रकरणातून समोर आले आहे.

चौथ्या दिवशी रक्ताची व्यवस्था

गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या ज्येष्ठ रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी ‘ए पॉझिटिव्ह’ गटाच्या दोन युनिट रक्ताची आवश्यकता होती. रुग्णाच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, रक्त मिळवण्यासाठी सलग तीन दिवस प्रयत्न सुरू होते. अखेर चौथ्या दिवशी दोन युनिट रक्ताची व्यवस्था झाली. त्यापैकी एक युनिट रुग्णालयाच्या रक्तपेढीने उपलब्ध करून दिले, तर दुसरे युनिट रुग्णाच्या मुलाने प्रयत्न करून मिळवले. त्यानंतर रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

Blood
Jarimari Mata Temple Navratri: स्वयंभू जरीमरी माता मंदिरात भक्तीचा जागर; मोगरा, चाफ्याच्या फुलांनी सजविण्यात आला मंदिराचा गाभारा

रक्तघटक वेळेत मिळणे महत्त्वाचे

रुग्णालयात उपचार सुरू असताना आवश्यक रक्तघटक वेळेत उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, त्यासाठी नातेवाइकांना अनेक दिवस शोधाशोध करावी लागत असल्याने रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांवरील ताण वाढत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news