फ्लॅटधारकांना आता भूखंडाचीही मालकी pudhari photo
मुंबई

Mumbai Vertical Property Card : फ्लॅटधारकांना आता भूखंडाचीही मालकी

व्हर्टिकल प्राॅपर्टी कार्डचा अभिनव उपक्रम सुरु

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील सर्व फ्लॅटधारक आता त्यांची इमारत उभी असलेल्या भूखंडाचेही मालक होणार आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने फ्लॅटधारकांना व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड देण्याचा प्रयोग मुंबईतूनच सुरू झाल्याने ही क्रांती होऊ घातली आहे. अर्थात जागरूक मुंबईकरांनी तातडीने आपल्या गृहनिर्माण सोसायटीच्या समितीकडे तगादा लावून हे प्रॉपर्टी कार्ड मिळवले नाही तर भविष्यात त्यांना असा मालकी हक्क कायमचा गमवावा लागू शकतो.

सध्याच्या प्रचलित व्यवस्थेनुसार कोणत्याही टॉवरचा भूखंड म्हणजेच जमीन एकतर विकासक किंवा सोसायटीच्या नावे असतो. घर घेणारा फक्त सदनिकेचा मालक ठरतो. सदनिकाधारकांचे नाव भूमी अभिलेखच्या उताऱ्यात जमिनीचा म्हणजे भूखंडाचा मालक म्हणून येत नाही. याचा परिणाम म्हणजे घराची मालकी सिद्ध करणेही नंतर कठीण होऊन बसते. ही अडचण दूर करण्यासाठीच महसूल खात्याने आता व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड आणले आहे.

या कार्डाचे थेट फायदे साधारणत: असे आहेत-

  • मुंबईतील प्रत्येक फ्लॅटमालकाला हे व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड मिळेल.

  • फ्लॅटचा मालक म्हणून आणि फ्लॅट ज्या इमारतीत आहे त्या इमारतीच्या भूखंडाचाही मालक म्हणून नोंद या व्हर्टिकल कार्डवर केली जाईल.

  • सदनिकेचा एकूण आकार, इमारतीच्या भूखंडाचा एकूण आकार आणि त्यात सदनिकाधारकाचा हिस्सा, मालकी हक्काचे स्वरूप या प्रॉपर्टी कार्डवर स्पष्ट नमूद असेल.

  • एखाद्या इमारतीत 100 सदनिका असतील तर या सदनिकांचे 100 मालक व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डवर सुनिश्चित केलेले असतील.

  • मुंबईतील सर्व हाऊसिंग सोसायट्यांनी आपल्या फ्लॅटधारकांसाठी हे व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड तातडीने काढून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी डिसेंबर 2027 ची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर असे प्रॉपर्टी कार्ड जुन्या मालमत्तांचे काढता येणार नाही.

  • सदनिकाधारकांनी आपल्या गृहनिर्माण संस्थेच्या सर्वसाधारण सभेत किंवा मासिक बैठकांत व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डचा मुद्दा उपस्थित करावा. एका फ्लॅटच्या व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डसाठी फक्त 500 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. त्या बदल्यात प्रॉपर्टी कार्ड आणि इमारतीच्या जमिनीचा सातबाराही फ्लॅटधारकाच्या नावासह मिळणार असल्याचे महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT