Fire Brigade Pudhari
मुंबई

Mumbai Fire Brigade Recruitment: पालिकेच्या अग्निशमनमध्ये १०० पदांना मंजुरी

सहाय्यक केंद्र अधिकारी, प्रमुख अग्निशामक, कनिष्ठ अभियंत्यासह विविध पदे; सहा महिन्यांसाठी मंजुरीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या मुंबई अग्निशमन दलाच्या खात्यामध्ये आता १०० नव्या पदांना सहा महिन्यांकरिता मंजुरी देण्याचा प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीच्या सभेत सादर करण्यात येणार आहे.

यात सहाय्यक केंद्र अधिकारी, प्रमुख अग्निशामक, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत विभाग), मुख्य लिपिक, दुकान अभिलेख आणि स्वयंचल वीजतंत्री -द्वितीय श्रेणी आदी संवर्गातील पदांना पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मंजुरी दिली आहे.

अग्निशमन दल खात्याच्या आस्थापना अनुसूचीवरील काही संवर्गातील पदे वाढ व घट करणेकरिता तसेच समान अर्हता असणाऱ्या पदांचा एक समान संवर्ग तयार करण्याकरिता १५ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

अग्निशमन दल खात्याच्या आस्थापनेवरील ७१ अनुसूचीत पदे व ५६ अन - अनुसूचीत पदे अशी एकूण १२७ पदे घट करण्यास आणि काही संवर्गातील पदनामात बदल करण्यात आली असल्याने सदर १०० पदे नव्याने निर्माण करण्यास पालिका आयुक्ताची यांनी ०५ डिसेंबर २०२५ रोजी मंजुरी प्राप्त झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT