पोटच्या मुलीवर अत्याचार File Photo
मुंबई

मुंबई : जन्मदात्याचा पोटच्या मुलीवर अत्याचार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासल्याची घटना शिवडी परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी नराधमाविरोधात पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला आरएके मार्ग पोलिसांनी अटक केली.

नराधम बाप हमालीचे काम करतो. घरात एकटी असणाऱ्या ११ वर्षीय आपल्या अल्पवयीन मुलीवर त्याने दोन- तीन वेळा लैगिंक अत्याचार केला. हा प्रकार अलीकडेच तक्रारदार महिलेला मुलीकडून समजला. त्यानंतर तिने आरएके मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना घडलेला प्रकार सांगून पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर नराधम बापाविरूद्ध पोलिसांनी पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच सोमवारी (दि.१२) रात्री उशिरा नराधम बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT