Mumbai Tragedy Pudhari
मुंबई

Mumbai Tragedy: जव्हेरी बाजारात विषारी वायूमुळे एकाचा मृत्यू, तर दुसरा गंभीर

Mumbai drainage death incident: टाकी साफ करताना दोघेही गुदमरले

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: जव्हेरी बाजारच्या तेल गल्लीत शुक्रवारी मध्यरात्री ड्रेनेज लाईन म्हणजेच मलनिःसारण टाकीत कचऱ्याचा गाळ काढण्यासाठी उतरलेले अनिल नायक (17) आणि मुनील नायक(14) हे दोन अल्पवयीन तरुण टाकीतल्या विषारी वायूमुळे गुदमरून बेशुद्ध पडले. यातील मुनील नायक यास डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच मृत घोषित केले.

ही दोन्ही मुले टाकी उपसत असताना तिकडे कुणाचे लक्ष नव्हते. ते किती वेळ बेशुद्ध पडले याचा अंदाज नाही. मात्र, एका पादचाऱ्याचे लक्ष गेले आणि त्याने आणखी काही लोकांना जमवून दोन्ही मुलांना टॅक्सीतून जी टी रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

मुनील नायक याला डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल केल्यावर मृत घोषित करण्यात आले. त्याचा सख्खा भाऊ अनिल नायक मात्र आयसीयूमध्ये दाखल असून त्याची परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अनिल आणि मुनील यांचे वडील कीर्ती नायक यांचा कचऱ्यातून किंवा सांडपाण्यातून सोनं वेचण्याच्ाा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून हे दोघे जण उदरनिर्वाह भागवत होते.

कीर्ती नायक यांना एक मुलगी आणि सहा मुले अशी एकूण सात आपत्ये आहेत. या दोघांना त्यांचा सख्खा मोठा भाऊ जोरजबरदस्तीने ड्रेनेज लाईनच्या टाकीत कचऱ्यातून सोने वेचण्यासाठी पाठवत असल्याचा आरोप घरच्या मंडळींनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT