Mumbai Dengue Malaria Pudhari
मुंबई

Mumbai Dengue Malaria: मुंबईत आढळल्या डेंग्यू, मलेरिया पसरवणाऱ्या डासांच्या अळ्या!

30 लाख 17 हजार घरांच्या परिसरात मुंबई महापालिकेकडून धूम्रफवारणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई शहर व उपनगरात डेंग्यू मलेरिया पसरवणाऱ्या डासांच्या अळी सापडल्यामुळे महापालिकेच्या कीटकनाशक विभागाची झोप उडाली आहे. 37 हजार 800 ठिकाणी डेंग्यूचा आजार पसरवणाऱ्या एडिस एजिप्ती डासांच्या अळ्या, तर 4 हजार 529 ठिकाणी मलेरिया वाहक ‌‘ऍनॉफिलीस स्टिफेन्सी‌’ डासांच्या अळ्या आढळून आल्या.

त्यामुळे तातडीने या अळ्या नष्ट करून 30 लाख 17 हजार घरांच्या परिसरात धूम्रफवारणी व कीटकनाशक फवारणी करण्यात आली. सुमारे 5 महिन्यांच्या कालावधीत महानगरपालिकेच्या सर्व 26 प्रशासकीय विभागांमध्ये 22 हजार 80 परिसर भेटी देण्यात आल्या. यात 32 लाख 51 हजार 623 घरांची तपासणी करण्यात आली.

कीटकनाशक खात्यातील 1 हजाराहून अधिक कामगार - कर्मचारी, अधिकारी कार्यरत असून मुंबईच्या कानाकोपऱ्यातील विविध भागांचे आणि इमारतींच्या परिसरांचे सर्वेक्षण आणि तपासणी नियमितपणे करण्यात येत आहे.

या तपासणीमध्ये इमारत परिसरातील पाण्याच्या टाक्या, झोपडपट्ट्यांमधील पाण्याचे पिंप, प्लास्टिक किंवा ताडपत्री मध्ये साचलेले पाणी, परिसरात पडून असले टायर आणि त्या टायरमध्ये साचलेले पाणी, झाडांच्या कुंड्यांखालील ताटल्या, शोभिवंत झाडांच्या कुंड्या, पाणी असणाऱ्या शोभेच्या वस्तू, नारळाच्या करवंट्या आणि त्यात साचलेले पाणी, फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या मधील किंवा बाटल्यांच्या झाकणांमधील पाणी आदी तपासणी करण्यात येत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आली.

या मोहिमेमध्ये डासांची अळी निर्माण होण्याची शक्यता असणारे 540 टायर्स आणि 1 लाख 16 हजार 251 अडगळीतील वस्तूंचे निष्कासन करण्यात आले. मुंबई शहर व उपनगरात सुरू असणाऱ्या चार हजार इमारत पुनर्विकास प्रकल्पाच्या ठिकाणी सुरक्षा अधिकारी यांना डास प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

डासांच्या उत्पत्तीस्थानावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. आयुक्त रस्त्यावर मलेरिया रोखण्यासाठी स्वतः पालिका आयुक्त अश्विनी भिडे रस्त्यावर उतरल्या आहेत. त्या शहर व उपनगरातील विविध ठिकाणच्या पाहणी दौऱ्यात कीटकनाशक चौक्यांना विशेष भेटी देत कामकाजाचा आढावा घेत आहेत. कामगार- कर्मचारी, अधिकारी यांच्याशी संवाद साधून कार्यस्थळावरील परिस्थिती, अडचणी आणि उपाययोजनांची माहिती जाणून घेत आहेत.

1 जानेवारी ते 7 मार्च पर्यंत आजार रुग्ण

मलेरया - 918

डेंग्यू - 182

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT