दादरसह पश्चिम उपनगरांत पाण्याविना नागरिकांचे हाल 
मुंबई

Mumbai water crisis : दादरसह पश्चिम उपनगरांत पाण्याविना नागरिकांचे हाल

पालिकेचे टँकर झोपडपट्टीत पोहोचलेच नाहीत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : जलवाहिनीच्या कामासाठी महापालिकेने शुक्रवारी व शनिवारी तिसरा शटडाउन घेतला आहे. दादरसह पश्चिम उपनगरांतील अंधेरी ते वांद्रे पूर्वेकडील भागांत शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा झाला नाही. याबाबत प्रशासनाने पूर्वकल्पना दिली होती. मात्र पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी असल्याने या भागात पाण्याविना नागरिकांचे हाल झाले. झोपडपट्टी भागाला याचा जास्त फटका बसला.

महापालिका प्रशासनाने या तिन्ही वॉर्डांत सुमारे 45 टँकरने पाणी पुरवठा केला. मात्र हे टँकरही कमी पडले. त्यामुळे खासगी टँकर मागवावे लागले. शनिवारीही काही भागांत सकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे सलग दोन दिवस पाणी न आल्याने या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.विविध इमारती व गृहसंकुलांमध्ये पाणी साठवण्यासाठी टाक्या असल्यामुळे येथे पाणी कपातीचा तितकासा फरक पडला नाही. झोपडपट्टीमध्ये मात्र अशी व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागले. टँकरचे पाणीही जेमतेम दोन ते तीन हंडे मिळाले. त्यामुळे अंधेरी ते वांद्रे पूर्वेला व दादर,धारावी परिसरात आज पाणीबाणीच उद्भवली होती.

या भागांत बसला सर्वाधिक फटका

धारावी लूप मार्ग, ए. के. जी. नगर, धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदिर मार्ग, दिलीप कदम मार्ग, जस्मिन मिल मार्ग, माहीम फाटक, ए. के. जी. नगर, विजय नगर मरोळ, मिलिटरी रोड, गावदेवी, मरोळ गाव, चर्च रस्ता, हिल व्ह्यू सोसायटी, कदमवाडी, भंडारवाडा, उत्तम ढाबा. महेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गापाडा, मामा गॅरेज, चकाला, प्रकाशवाडी, गोविंदवाडी, मालपा डोंगरी,इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग क्षेत्र, चिमटपाडा, सागबाग, कांतीनगर, कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT