मुंबई: गॅस सेवा बंद होऊ नये म्हणून तातडीने पंधरा रुपये भरण्यास सांगून बोगस एपीके लिंक पाठवून वृद्धाची सायबर ठगांनी १० लाख ३५ हजाराची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
६२ वर्षांचे तक्रारदार त्यांच्या पत्नी व मुलासोबत परळ येथे राहतात. ३० जूनला त्यांना एका अज्ञाताने कॉल करून तो महानगर गॅस लि. कंपनीचा प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगून गॅस सेवा बंद होऊ नये म्हणून तातडीने पंधरा रुपये बिल पेमेंट करावे लागेल, असे सांगितले.
त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने त्यांना व्हॉटअपवर एक लिंक पाठवून पंधरा रुपये भरण्याचा सल्ला दिला. त्यांनी ती लिंक ओपन करून बँकेची माहिती भरल्यानंतर काही वेळात त्यांच्या खात्यातून १० लाख ३५,८१७ रुपये डेबीट झाले होते.