Mumbai CSMT  file photo
मुंबई

Mumbai CSMT News|सीएसएमटी स्थानकावर छताचा भाग कोसळला; दोन प्रवासी जखमी

Mumbai CSMT News | सीएसएमटी स्थानकावर छताचा भाग कोसळला; दोन प्रवासी जखमी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई- मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने एक चिंताजनक घटना घडली आहे. २२ ऑक्टोबर रोजी रात्री १०:०५ वाजण्याच्या सुमारास बुकिंग हॉलच्या प्रवेशद्वाराजवळ छताचा काही भाग अचानक कोसळल्यामुळे दोन प्रवासी जखमी झाले. विशेष म्हणजे, या परिसरामध्ये रेल्वे लँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (RLDA) मार्फत सुमारे ३,००० कोटी रुपयांच्या विकासकामांचा भाग म्हणून काम सुरू होते.

या दुर्घटनेमुळे सुरू असलेल्या विकासकामांच्या दर्जाबाबत आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांमधून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या दुर्घटनेत विनायक बाळू हाटकर (वय २८) आणि अयान नौशाद मातवणकर (वय २४) हे दोघे जखमी झाले आहेत. विनायक हाटकर यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूला ३ ते ४ सेंटीमीटरची जखम झाली आहे. त्यावर टाके घालण्यात आले आहेत, तर अयान मातवणकर यांच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या पापणीला, उजव्या खांद्याच्या मागील भागावर व मानेवर खरचटले आहे. तर उजव्या घोट्याला वेदना व सूज आली आहे.

या दोन्ही जखमी प्रवाशांना तत्काळ सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या अपघात विभागात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिथे त्यांच्यावर योग्य उपचार आणि पुढील वैद्यकीय तपासणी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT